Kirjojen hintavertailu. Mukana 11 342 296 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjahaku

Etsi kirjoja tekijän nimen, kirjan nimen tai ISBN:n perusteella.

2 kirjaa tekijältä Dasoo Vaidya

Tatpoorvi

Tatpoorvi

Dasoo Vaidya

Rajpal Sons
2014
pokkari
'तत्पूर्वी' या संग्रहातल्या कवितांना स्वतःचा असा एक चेहरा आहे, आणि तो आहे वर्तमानाचा. संवेदनशीलता आणि चिंतनशीलता, अचूक शब्दयोजना आणि नेटक्या प्रतिमा, वर्तमानाचे नेटके भान आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, वाचकाला सहज कवेत घेणारी लय आणि आशयाची टोकदार मांडणी अशी काही वैशिष्ट्ये त्यांच्या या संग्रहातील कवितांची सांगता येतील. कवीच्या मनात असलेले काळाचे आणि त्याच्या शक्तीचे भान या कवितांतून ठळकपणे जाणवते. आज महानगरांत, शहरांत, गावांत, खेड्यांत राहणारा माणूस कोणकोणत्या मनोवस्थांतून जात आहे याचे चित्रण दासू वैद्य अतिशय समर्पक पद्धतीने करतात. आधुनिकतेच्या झुली पंघारताना जात आणि धर्म यांच्या अदृश्य भिंती समाजात केवळ उभ्या राहत नाहीत तर बळकटही होत आहेत याविषयीचा खेद दासूच्या अनेक कवितांतून व्यक्त होतो. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात माणसांच्या नात्यांत आलेला यांत्रिकपणा, कोणाही सुसंस्कृत माणसाच्या मनाला वेदना देणाऱ्या कृती आणि उक्ती यात तफावत आढळणाऱ्या ज्या अनेक घटना भोवती घडताना दिसतात त्यांवर दासू वैद्य यांनी भाष्य केले आहे. थोडक्यात, दासू वैद्य यांचा हा कवितासंग्रह वर्तमानाचे भान देतानाच वाचकाला विचारप्रवृत्त करणारा आहे.
Mela

Mela

Dasoo Vaidya

Popular Prakashan Pvt. Ltd.
2022
pokkari
दासू वैद्य यांचं 'लोकसत्ता'मधलं 'यमक आणि गमक' हे सदर वाचकप्रिय झालं ते त्याच्या साहित्यिक मूल्यामुळेच. या सदराच्या निमित्ताने वर्षभर त्यांनी लिहिलेल्या लेखांचं 'मेळा' हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. खरंतर सादरलेखनाचा हा दासू वैद्य यांचा पहिलाच प्रयत्न. दर आठवड्याला ठराविक शब्दमर्यादेत लेखन करणं संवेदनशील कविमनाच्या वैद्यांना फारसं कठीण गेलं नाही. कवितेत परावर्तित न झालेले अनेकरंगी अनुभव गाठीशी होते, बालपणीच्या कडूगोड आठवणी होत्या आणि हे सारं शब्दांत मांडण्यासाठी आवश्यक असलेली काव्यमय शैली त्यांच्याजवळ होती. असं सारं जमून आल्यावर व्यक्त व्हायला आतुर असलेल्या अनुभवांना शब्दरूप मिळायला फारसा वेळ लागला नाही. वर्तमानपत्रातल्या लेखनाशी जेव्हा वाचकाची नाळ जुळते, वाचक लेखकाच्या अनुभवाशी, विचाराशी एकरूप होतो तेव्हाच सदरलेखन खऱ्या अर्थाने लोकप्रिय होते. अशी वाचकप्रियता वैद्य यांना 'रंग' या अगदी पहिल्या लेखापासून मिळाली. या संग्रहात गद्यकाव्य म्हणावेत असे तरल अनुभव देणारे लेख आहेत तसेच आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे वैचारिक लेखही आहेत. काही गमतीदार आठवणी सांगणारे तर काही वाचकाला अंतर्मुख करणारे लेख आहेत. सर्वांत महत्त्वाची आहेत ती दोन पत्रं, एक तामिळ लेखक पेरूमल मुरुगन यांना उद्देशून लिहिलेलं आणि दुसरं, नाटककार विजय तेंडुलकर यांना उद्देशून लिहिलेलं. म्हटलं तर दोन्ही पत्रांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, म्हटलं तर आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा वाचकांनीच ती वाचून त्यांवर विचार करावा हेच अधिक योग्य.