Kirjojen hintavertailu. Mukana 11 342 296 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjahaku

Etsi kirjoja tekijän nimen, kirjan nimen tai ISBN:n perusteella.

11 kirjaa tekijältä Satish Alekar

Collected Plays of Satish Alekar

Collected Plays of Satish Alekar

Satish Alekar

OUP India
2010
nidottu
Satish Alekar has written, acted in, directed, and produced some of the most influential and progressive plays of post-Independence India, and is part of the trinity, with Vijay Tendulkar and Mahesh Elkunchwar, that has shaped modern Marathi theatre. Alekar is widely recognized for his ability to portray the many deceptions and fallacies of Indian society, and his plays depict with wit and sensitivity, a world unable to come to terms with modernity and stifled by tradition. The six plays-The Dread Departure (Mahanirvan), Deluge (Mahapoor), The Terrorist (Atirekee), Dynasts (Pidhijat), Begum Barve, and Mickey and the Memsahib (Mickey ani Memsahib) -are divided thematically into two sections and both sections include introductions by noted theatre critic, Samik Bandyopadhyay. The book also includes an insightful interview of Alekar by Bandyopadhyay, notes on the production histories of the included plays, and a special section containing photographs of the performances of these plays.
Two Plays

Two Plays

Satish Alekar

SEAGULL BOOKS LONDON LTD
2024
nidottu
A collection of two plays by Indian playwright Satish Alekar. Satish Alekar is widely considered one of the most progressive and influential playwrights in modern Indian theatre. This volume brings together two of Alekar’s plays written over half a century apart, The Grand Exit and A Conversation with Dolly. In The Grand Exit, written in Marathi in 1974, a dead man insists on being cremated in an old crematorium that will soon be privatized. In this irreverent masterpiece, father and son confront the mundane to honor the former’s final wish. A Conversation with Dolly is the most contemporary of Alekar’s plays, and his first to be published before it has been performed. In this play, an old man finds himself locked down during the COVID-19 pandemic, surrounded by Amazon boxes, talking and listening to his devoted nurse Dolly. Both plays are followed by interviews with the playwright which shed light on the origins and design of Alekar’s dramaturgical genius.
Mahapoor

Mahapoor

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
महापूर' ही प्रेमभंगामुळे शिक्षणातल्या बेताच्या गतीमुळे, कमी कष्टामुळे, विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या नायकाची हुरहुर लावणारी 'देवदास'ची आठवण व्हावी अशी उत्कट नाट्यकहाणी आहे, पण 'महापूर' हे नाटक 'महानिर्वाण' व 'बेगम बर्वे' ह्या नाटकांसारखा सार्वत्रिक व सार्वकालिक, एकाच वेळी शाश्वत व अशाश्वत सुखदुःखाचा नाट्यानुभव देत नाही, कारण त्याचा कालावकाश विशिष्ट व अपवादात्मक आहे -- आणि ही अवस्था ओलांडली जात नाही. अपवाद अपवादच राहतो. 'महापूर' मधे एखाद्या अधिभौतिक अवस्थेचं दर्शन नाही अथवा एखाद्या सामाजिक परिस्थितीचं अवलोकन नाही, तर त्यात एका तोल ढळलेल्या तरुणाच्या विशिष्ट मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. 'महापूर' मधली कालावकाश रचना अत्यंत आकर्षक व नाटकीय आहे. 'इक्वस' मधल्या मनोरुग्ण तरुणाची एका मानसोपचारतज्ज्ञाने केलेल्या विचारपूसवजा चौकशीची आठवण येते. स्वतःच निर्मिलेल्या भ्रमात फसलेल्या तरुणाची ही नाटकीय कहाणी चटका लावते. 'महापूर' हे तीव्रोत्कट भावावस्थेचा अनुभव देणारं एक चांगलं नाटक आहे. - राजीव नाईक ('आळेकरी नाट्यकालावकाश'. मुक्त शब्द, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)
Begam Barve

Begam Barve

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
बेगम बर्वे' वैयक्तिक शारीर-मानस असोशीबद्दल, साकार न झालेल्या इच्छांबद्दल, चिरंतन अव्याहत वेदनांबद्दल, कोंडलेल्या लैंगिकतेबद्दल आहे; तसंच ते सामाजिक दडपणांबद्दल, शोषितांच्या अस्फुट आक्रोशांबद्दल, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवांबद्दल, आर्थिक दमनाबद्दलही आहे. हे अभिजाततेच्या अंगाने फुलणारं नाटक एक करुण लोकनाटक होऊन जातं. 'महानिर्वाण' बाह्य/सामजिक दडपणांबद्दल, पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेबद्दल. सनातन, कर्मठ, जाचक धर्मरूढींबद्दल, धर्माच्या सत्ताकारणाबद्दल, परिवर्तनशक्य अशा वर्तमानातील शाश्वत सामाजिकतेबद्दल आहे; तितकंच ते अंतर्गत मानसिक घुसमटीबद्दल, लैंगिक असमाधानाबद्दल, नागरी नियंत्रणाबद्दल. कदाचित अटळ अशा दुर्दैवी शाश्चत मानसिकतेबद्दलही आहे. हे लोकघाटणीच्या जवळ जाणारं, नाटक हळूहळू दाटपणे अभिजात बनतं. ही दोन्ही नाटक हसण्याच्या मार्गाने कारुण्याच्या घामाला नेतात. व्यक्तीच्या सुखदु खांबद्दल आणि समाजाच्या रचना व्यवस्थेबद्दल बोलतात. ही नाटक एकाच वेळी लोकरंगी व अभिजात होतात; धार्मिक, आर्थिक, लैंगिक राजकारण मांडतात आणि आर्तपणे काही पुकारतातही. 'महानिर्वाण'मधे 'आवा चालली पंढरपुरा' म्हणताना भाऊरावांचे आणि 'बेगम बर्वे मधे 'दया छाया में निवारुनिया' म्हणताना बर्वेचे एकल स्वर हृदयातून उमटतात आणि ह्या दोघांचेही उच फैलावलेले हात मात्र त्या वेळी समस्त लोकांनाच जणू साद घालतात. ही दोन्ही नाटक एकाच वेळी उत्कटपणे काव्यात्म व प्रच्छन्नपणे राजकीय होतात. महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' ही आळेकरी नाटकं श्रेष्ठ ठरतात. राजीव नाईक (आकरी कालावकाश' मुक्त शब्द ऑक्टोबर नोव्हेंबर २०२२)
Mahanirvan

Mahanirvan

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
महानिर्वाण' बाह्य / सामजिक दडपणांबद्दल, पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेबद्दल, सनातन, कर्मठ, जाचक धर्मरूढींबद्दल, धर्माच्या सत्ताकारणाबद्दल, परिवर्तनशक्य अशा वर्तमानातील शाश्वत सामाजिकतेबद्दल आहे; तितकंच ते अंतर्गत मानसिक घुसमटीबद्दल, लैंगिक असमाधानाबद्दल, नागरी नियंत्रणाबद्दल, कदाचित अटळ अशा दुर्दैवी शाश्वत मानसिकतेबद्दलही आहे. हे लोकधाटणीच्या जवळ जाणारं, नाटक हळूहळू दाटपणे अभिजात बनतं. 'बेगम बर्वे' वैयक्तिक शारीर-मानस असोशीबद्दल, साकार न झालेल्या इच्छांबद्दल, चिरंतन अव्याहत वेदनांबद्दल, कोंडलेल्या लैंगिकतेबद्दल आहे; तसंच ते सामाजिक दडपणांबद्दल, शोषितांच्या अस्फुट आक्रोशांबद्दल, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवांबद्दल, आर्थिक दमनाबद्दलही आहे. हे अभिजाततेच्या अंगाने फुलणारं नाटक एक करुण लोकनाटक होऊन जातं. ही दोन्ही नाटकं हसण्याच्या मार्गाने कारुण्याच्या धामाला नेतात. व्यक्तीच्या सुखदु खांबद्दल आणि समाजाच्या रचना व्यवस्थेबद्दल बोलतात. ही नाटकं एकाच वेळी लोकरंगी व अभिजात होतात; धार्मिक, आर्थिक, लैंगिक राजकारण मांडतात आणि आर्तपणे काही पुकारतातही. 'महानिर्वाण'मधे 'आवा चालली पंढरपुरा' म्हणताना भाऊरावांचे आणि 'बेगम बर्वे'मधे 'दया छाया घे निवारुनिया' म्हणताना बर्वेचे एकल स्वर हृदयातून उमटतात आणि ह्या दोघांचेही उंच फैलावलेले हात मात्र त्या वेळी समस्त लोकांनाच जणू साद घालतात ही दोन्ही नाटकं एकाच वेळी उत्कटपणे काव्यात्म व प्रच्छन्नपणे राजकीय होतात. 'महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' ही आळेकरी नाटकं श्रेष्ठ ठरतात. राजीव नाईक ('आळेकरी नाट्यकालावकाश', मुक्त शब्द, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)
Zulta Pool Ani Itar Ekankika

Zulta Pool Ani Itar Ekankika

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
झुलता पूल' ही या संग्रहातील एक महत्त्वाची एकांकिका. या एकांकिकेबद्दल सुप्रसिद्ध नाटककार आणि नाट्यसमीक्षक राजीव नाईक यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात, ""पुष्कळशा मिथक कथा कुठल्या तरी वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण करू पाहातात. तशी सत्यनारायण पूजेच्या संदर्भातली नवकल्पित कथा इथे येते. एक नदी ह्या शहराचं दोन भागांत विभाजन करते हे भौगोलिक सत्य एक सामाजिक-मानसिक विभाजनदेखील कसं ठरतं, हे ठसवणारी कथा. दैविक-स्तुतीची टर उडवत, उलटकरण साधू इच्छित कथा सांगितली जाते.. ... या एकांकिकेत दोन अवकाश आहेत. हे दोन अवकाश भौगोलिक आहेत तसे आर्थिक मिती असलेलेही आहेत. आर्थिकतेमुळे सामाजिकता ठरली आहे. दोन्ही अवकाश उच्चवर्णीयच असावेत. ह्या आर्थिकतेने ठरलेल्या सामाजिकतेमुळे मानसिकदृष्ट्याही हे अवकाश निराळे होतात. इथे जन्म-जातीचा संबंध नाही. विशिष्ट संस्कृतींना जन्म देणारी आर्थिकता ठसते; पण ही आर्थिक मिती शिक्षणामुळे, पेशामुळे आहे, भौतिक ध्येयं आणि मूल्यं ह्यातल्या बदलांमुळे आहे. हे विभाजन ठळक आहे, ढोबळही आहे. हे दोन्ही अवकाश मध्यमवर्गीयच आहेत; एक जरा वरचा आणि एक जरा खालचा. ...ह्यातल्या दोन अवकाशांत फरक आहे, पण त्यात झुलता का होईना पूलही आहे. वर्ग, वर्ण, जात, धर्म, भाषा, प्रांत, स्वयंपाक, विचारसरणी ह्यात टोकाचा फरक नाही. हे दोन जीव एकत्र आले तर समाज हादरणार नाही. पण हा किंचितसा फरकच खूप होतो. हळहळ किंचितपणातच आहे; म्हणूनच ती फुटत नाही, ठुसतठुसत राहते. कुठल्या का कारणाने होईना दोन सामाजिक अवकाशातल्या मुलामुलींचे वैयक्तिक अवकाश जरासे मिळाल्यासारखे होतात आणि व्यक्तिगत अभिरुचीमुळे नव्हे तर सामाजिक अलगपणामुळे ती दोघं जवळ येत नाहीत. ह्याला एकतर्फी प्रेम म्हणा, अप्राप्याची आकांक्षा म्हणा, असमाधानातली हुरहुर म्हणा. सौ
Dusara Samana

Dusara Samana

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
दुसरा सामना' हे सतीश आळेकरांचं १९८९ साली प्रकाशित झालेलं एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीतील ग्रामीण राजकारणावर आधारित असलेल्या 'सामना"""" या गाजलेल्या चित्रपटाचा उत्तरार्ध म्हणजे हे नाटक असं म्हणता येईल. 'सामना' चित्रपटात मारुती कांबळे नावाचं एक पात्र आहे. संपूर्ण चित्रपटात या पात्राभोवती एक गूढ वातावरण तयार केलेलं आहे. चित्रपटातला मास्तर गावच्या सरपंचाला, ""मारुती कांबळेचं काय झालं? हा प्रश्न सतत विचारताना दिसतो. या प्रश्नाचं उत्तरच जणू आळेकरांच्या 'दुसरा सामना"" - या नाटकात मिळतं. सहकारी साखर कारखानदारीतल्या राजकारणाची काळी बाजू चित्रपटात दाखवली आहे तर सहकारी कारखानदारीची जमेची बाजू या नाटकातून समोर येते. शासन आणि प्रशासन याच्यात योग्य समन्वय असेल तर या सहकारी कारखानदारीतून ग्रामीण भागाचा विकास करणं कसं शक्य आहे, हेच या नाटकातून आळेकरांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. सहकार, कारखानदारी यातून पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा होत गेला. हे समजून घेण्याच्या दृष्टीने हे नाटक महत्त्वाच ठरत.
Aadharit Ekankika

Aadharit Ekankika

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
सतीश आळेकर यांनी १९६८ ते २००५ दरम्यान विविध कारणांनी स्वैर रूपांतरित केलेल्या अन्य लेखकांच्या कलाकृतींवर आधारित एकांकिका या संग्रहात एकत्रित केल्या आहेत. जॉन मॉर्टिमर या ब्रिटिश नाटककाराच्या 'द जज्ज' या नाटकावर आधारित 'जज्ज' ही आळेकरांनी लिहिलेली पहिली एकांकिका या संग्रहात वाचायला मिळेल. त्याबरोबरच जर्मन नाटककार टांक्रेड डॉर्त यांच्या 'द वॉल' आणि 'द कर्व्ह' या दोन एकांकिकांवर आधारित 'भिंत' आणि 'वळण', ब्रिटिश नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या 'द डम्ब वेटर'वर आधारित सुपारी, इजिप्शियन नाटककार आल्फ्रेड फराग यांच्या दोन स्वगतांवर आधारित 'आळशी अत्तरवाल्याची गोष्ट' आणि 'नशीबवान बाईचे दोन', अमेरिकन नाटककार मरे शिगल यांच्या 'द टायपिस्ट' या एकांकिकेवर आधारित 'कर्मचारी' आणि नाशिकचे लेखक रत्नाकर पटवर्धन यांच्या 'यमी' कथेवर आधारित 'यमूचे रहस्य' अशा एकूण आठ एकांकिकांचा समावेश या संग्रहात केला आहे.
Shaniwar Raviwar

Shaniwar Raviwar

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
माणूस नेहमीच आपल्या वाट्याला आलेली दुःखाची पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असतो. मुळात खेळ हा प्रकारच गुंतवून घेणारा असतो. त्या खेळात आनंद शोधून विरंगुळा करून घ्यायचा असतो. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अपत्य नसलेले एक दाम्पत्य आपल्याला मूल नसल्याचे दुःख कवटाळत बसण्यापेक्षा वेगवेगळी पात्रे, प्रसंग, घटना 'जन्माला' घालतात आणि सुट्टीचा दिवस साजरा करतात. त्या आनंदाच्या भास-आभासाचा उत्सव म्हणजे 'शनिवार रविवार' हे नाटक ही गोष्ट जरी निपुत्रिक दाम्पत्याची असली तरी या नाटकाचा विषय फक्त त्या दाम्पत्यापुरता सीमित नाही. या नाटकातून नाटककाराला आणखी बरेच काही सुचवायचे आहे. माणूस हा दुःखापासून सदैव पळ काढण्याचाच प्रयत्न करत असतो. त्या दुःखातून सावरण्यासाठी आयुष्यभर वेगवेगळे खेळ खेळत असतो. त्या दुःखाची आणि खेळाची तऱ्हा तेवढी वेगवेगळी असते. त्याचा प्रभाव कधी दीर्घकाळ असतो, कधी-कधी क्षणभराचाही असतो. पण मूल नसल्याचे दुःख गोंजारण्यापेक्षा, सुट्टीच्या दिवशी त्यात अडकून पडण्यापेक्षा या नाटकाच्या माध्यमातून मानवी मनाचे लपंडाव अधोरेखित करण्यात आले आहेत. (दैनिक 'प्रहार' १ मार्च २०१५ )
Atirekee

Atirekee

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
आळेकरी नाट्यकालावकाश पुष्कळसा दोन पिढ्यांमधे विभागलेला आहे. इतर नाटकांमध्ये 'झुलता पूल'प्रमाणे सामाजिक अवकाशांची दखल नाही, तर दोन पिढ्यांच्या एकूण कालावकाशातला फरकच प्रमुख ठरला आहे. पिढीपिढीत काळाचा फरक अध्याहृत आहे. ह्या नाटकांमधे पुढच्या पिढीचा भौतिक अवकाश बदलतोच असं नाही. गाव ते शहर, भारत ते परदेश अशा तऱ्हेचा अवकाश-बदल नाही. त्याच्यामुळे काही पिढीपिढीतले संबंध ठरत नाहीत. पण पिढीपिढीतले मानसिक अवकाश मात्र खूप बदलतात. हे काळ बदलल्यामुळेच घडलेलं असतं, स्थलांतरामुळे नाही. त्यामुळे ते अधिक उसतातही. उदाहरणार्थ, 'महानिर्वाण', 'महापूर', 'अतिरेकी', 'पिढीजात', 'एक दिवस मठाकडे' आणि बहुतेक नाटकांत वेगवेगळे 'तो' स्वतः काही करण्याचा प्रयत्नच न करता आधीच्या पिढीवर खुन्नस काढताना दिसतात. त्याची चिडचिड समजून घेता येते, पण ते स्वतःला बहाल करणार हौतात्म्य वलय अनाकलनीय वाटत राहतं. - राजीव नाईक ('आळेकरी नाट्यकालावकाश', मुक्त शब्द ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)
Pidhijaat / Mickey Ani Memsaheb

Pidhijaat / Mickey Ani Memsaheb

Satish Alekar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
या पुस्तकात 'पिढीजात' आणि 'मिकी आणि मेमसाहेब' अशी दोन नाटके आहेत. 'पिढीजात' हे सगळ्यात अलीकडचे अतिशय महत्त्वाचे नाटक. आळेकरी शैलीची सर्व वैशिष्ट्ये असलेले हे नाटक एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलते, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डांगोरे न पिटता या पेचाला सहृदयतेने सामोरे जाते, त्यातली गोची समजून घेते आणि या काळातल्या 'बाप' पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचे न-नैतिक होणेही दाखवते. 'मिकी आणि मेमसाहेब' या नाटकाचे कथानक प्राध्यापक पती, त्याच्याच हाताखाली लेक्चरर म्हणून काम करणारी त्याची तरुण पत्नी (मेमसाहेब), काही कारणाने अनेक वर्षे रिसर्च अडकलेला त्याचा विद्यार्थी गुळवणी आणि त्याच्या प्रयोगशाळेतील एक उंदीर (मिकी) यांच्या भोवती फिरते. वरवर साधे वाटणारे हे नाटक पूर्णपणे प्रतीकात्मक आहे हे हळूहळू लक्षात येत जाते. सरळ विधान करणे कटाक्षाने टाळत, अतिशय कलात्मकतेने आळेकरांनी प्रेक्षकांसमोर प्राध्यापकाची शोकांतिका मांडली आहे. वरकरणी सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये खोलवर दडून असलेली हिंस्रता या नाटकातून व्यक्त होते. प्राध्यापकाची होणारी घुसमट, कुचंबणा, वेदना, संताप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वांझ विद्रोह हे सारे आळेकरांनी अत्यंत प्रभावी अशा स्वगतांमधून व्यक्त केले आहे. संपूर्ण नाटक बऱ्याच अंशी मानसिक पातळीवरच घडताना दिसते तरीही आळेकरांना जे सांगायचे आहे ते सहजतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचते हे या नाटकाचे मोठे यश आहे.