Kirjojen hintavertailu. Mukana 11 244 527 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjahaku

Etsi kirjoja tekijän nimen, kirjan nimen tai ISBN:n perusteella.

13 kirjaa tekijältä Shyam Manohar

Shyam Manohar

Shyam Manohar

Shyam Manohar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
I believe Shyam Manohar is the only Marathi intellectual who is breaking the Marathi mould and exploring new grounds on thought plane. It is very important to appreciate and project him as something extra-ordinary. Tell him that I greatly admire his deep explorations of mind and thought. - Naresh Dadhich M. A. Ansari Chair for Theoretical Physics Jamia Milia Islamia Central University New Delhi and Former Director and Professor Emeritus IUCAA, Pune. (Excerpt from a letter to Sunil Tambe) श्याम मनोहर हे रूढ मराठी साचा तोडणारे आणि विचारांच्या पातळीवर नव्या भूमीचा शोध घेणारे एकमेव मराठी बुद्धिवंत आहेत, अशी माझी धारणा आहे. त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना अनन्यसाधारण म्हणून प्रक्षेपित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते घेत असलेल्या मनाच्या व विचारांच्या सखोल शोधाची मी खूप प्रशंसा करतो, असे त्यांना कळवा. - नरेश दधिच सैद्धांतिक भौतिकीचे एम. ए. अन्सारी अध्यासन जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली आणि भूतपूर्व संचालक व प्रोफेसर एमेरिटस् आयुका, पुणे (सुनील तांबे यांना लिहिलेल्या पत्रातील उतारा)
Priyanka Aani Don Chor

Priyanka Aani Don Chor

Shyam Manohar

Popular Prakashan Pvt Ltd
2016
pokkari
अनेक श्रीमंत कुटुंबांत मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियांका आणि ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष तिने भाडे घेऊन राहायला दिलेले दोन चोर अशी तीन पात्रे या नाटकात आहेत. हे तिघेही अर्थातच गरीब आहेत. छोटे आहेत. छोट्या लोकांची स्वप्नेही तशी छोटीच असतात तशीच ती या तिघांचीही आहेत. घरी महिनाभराचा किराणा भरता येणं ही प्रियांकाच्या आनंदाची परिसीमा आहे तर सोनसाखळी चोरायची असा निश्चय करणाऱ्या चोराला ती मिळत नाही ही त्या चोराच्या दुःखाची परिसीमा आहे. तिसऱ्या चोराचीही अशीच छोटोमोठी स्वप्नं आहेत. पण छोट्या लोकांच्या छोट्या अपेक्षाही नियती पूर्ण होऊ देत नाही, असा गंभीर आशय मांडणारं हे नाटक आहे.
Yalkot

Yalkot

Shyam Manohar

Popular Prakashan Pvt Ltd
2016
pokkari
बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे श्याम मनोहर हे महत्त्वाचे नाटककार. नाट्यतंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणाने पण उपहासाने, वेगळ्या निरीक्षण शक्तीने आशय अधोरेखित करतात. ही मनोहारी शैली नाट्य दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची हृदय आणि यळकोट ही दोन नाटकं दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली. मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर एका पाठोपाठ नाटकं करत असतानाच यळकोट नाटक माझ्या हाती आलं. व्यावसायिक प्रायोगिक असा अग्रक्रम किंवा भेदाभेद मी कधीच केला नाही. जे नाटक त्याक्षणी ज्या मंचावर करावंसं वाटलं ते मी बेधडकपणे केलं. यळकोट वाचून मी अक्षरश उडालोच. यातले संवाद कोणते नटनट्या बोलतील? इनॅक्ट करूशकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल ? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल ? त्यातला वरवरचा बोल्डनेस झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल ? असे असंख्य प्रश्न आ वासून उभे राहिले. पण नाटक आतून आवडलं होतं. त्याची काहीतरी अर्थपूर्ण गंमत मला दिग्दर्शक म्हणून खुणावत होती. दिग्दर्शक म्हणून एका थिएटर गेमच्या पेसने मी जाणीवपूर्वक वेगवान हालचाली आणि कॉम्पोझिशन्स करत करत नाटक गतिमान ठेवलं होतं. शिवाय श्याम मनोहरांच्या अचूक बोलीभाषेकडे, प्रवाहीपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतंच. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने यळकोटचे उत्तम प्रयोग झाले. - चंद्रकांत कुलकर्णी
Shambhar Mee

Shambhar Mee

Shyam Manohar

Rajpal Sons
2012
pokkari
'हे ईश्वरराव हे, पुरुषोत्तमराव', 'शीतयुद्ध सदानंद', 'खूप लोक आहेत', 'उत्सुकतेने मी झोपलो', 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' या मराठी गद्याच्या मापदंडमालिकेतली पुढची निर्मिती म्हणजे 'शंभर मी'. ही शंभर ठिपक्यांची रांगोळी आहे. त्यात वाचकांनी आपल्या कल्पनेने रेषा जोडून रंग भरायचे आहेत. या पुस्तकात श्याम मनोहरांची भूमिका आर्किटेक्टची आहे. त्यांनी दिलेल्या आराखड्यातून आणि स्पेक्समधून आपल्या बुद्धीनुसार वाचकांनी वास्तुनिर्मिती करायची आहे. या पुस्तकात श्याम मनोहरांनी सर्वस्वी वेगळ्या उपायाचा अवलंब केला आहे. इथे बर्याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट केला आहे आणि केवळ कथनपूर्व मजकूर आणि कथनोत्तर मजकूर ( प्रि टेक्स्ट आणि पोस्ट टेक्स्ट) वाचकांच्या हाती सोपवला आहे. कित्येक वेळा टेक्स्टलेसनेसचा (मजकूरविहीनतेचा) चक्रावून टाकणारा अनुभव वाचकाला देणारा मराठीतला हा एक अनोखा प्रयोग आहे.
Yakrut (Pppl)

Yakrut (Pppl)

Shyam Manohar

POPULAR PRAKASHAN LTD
1905
pokkari
कुत्रे' हे विजय तेंडुलकरांचे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक. परंतु इतक्या वर्षांनंतरही ते कालबाह्य वाटत नाही. कारण तत्कालीन परिस्थितीपेक्षा तेंडुलकरांच्या नाटकांमधून मानवी वृत्ती-प्रवृत्तींना असलेले महत्त्व. 'कुत्रे'मध्येही तथाकथित सभ्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या भ्याड, षंढ मनोवृत्तीचे अतिशय बोचरे चित्रण तेंडुलकरांनी केले आहे. लोकनाट्याचा बाज असलेल्या या नाटकात नेपथ्याऐवजी वातावरणनिर्मिती करणाऱ्या स्लाइड्स वापरून एक नवे तंत्र तेंडुलकरांनी विकसित केलेले दिसते. मराठी रंगभूमीला आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने नवीन काही देणारे हे नाटक आहे.
He Ishwarrao...he Purushottamrao... (?? ????????... ?? ?????????????...)
श्याम मनोहर या मनुष्याने मराठी गद्याला हाताशी धरून कादंबरीत जी काही उलथापालथ केली आहे ती उलगता उलगता कित्येक पाने खर्ची पडावी अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे, 'हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव' या पुस्तकावर बोलणं इतकं सोपं नाही. विक्षिप्त रॅशनॅलिटीच्या भाषेत बोलणाऱ्या या लेखकात प्रसंग, पात्रे, वर्णने आणि निवेदने हे त्या भाषेचे नाम, सर्वनाम, क्रियापद आदीं समतुल्य भाषाघटक असतात. त्यामुळे त्यांच्या कादंबरीतली पात्रे एकाच उफराट्या मराठीत, कधी ग्रांथिक तर कधी बोलचालीच्या तालुकाप्लेसच्या मराठीत, पण विक्षिप्त रॅशनॅलिझमच्या भाषेत बोलतात. त्यांचं प्रत्येक पात्र हे एकच, एकाचीच भाषा बोलतं. एकाच युजरने वेगवेगळ्या नावाने लॉगीन करावं किंवा एकाच माणसाने आपली वेगवेगळी प्रोफाईल्स बनवून एकमेकांशी चॅटावं तशी त्यांची सगळी वेगवेगळी पात्रं फक्त देहरूपाने अस्तित्वात असतात. त्यांना लेखकाच्या मंत्रशक्तीने तेवढ्यास तेवढं बोलायची वाचा मिळते आणि हा अनेकपात्री प्रयोग नैसर्गिकपणे तळाशी एकपात्री आणि तळाखालून एकजोड होऊन जातो. इतर ठिकाणाप्रमाणे याही कादंबरीत तुलनेने संथ असलेला, फारसा हालता नसलेला, भाषेच्या परिणामसाक्षेपाला अवसर देणारा तालुकाप्लेसचा परिसर वापरलेला आहे. आयुष्याच्या लघुतेबद्दलची समजुतदार चमक या पुस्तकात मायक्रोडिटेलिंगच्या अनुरोधाने प्रकटते आणि पुस्तकभर पसरते. ईश्वरराव, पुरुषोत्तमराव, आत्माराम, काणे, खामकर, सुखदेव, ज्यूनिअर, सीनिअर, विअ, तातोबा, जालिंदर, बनसोडे, चितळे, कुलकर्णी, यार्दी, सासवा, बायका, पोरेटोरे अशा लोकांच्या रूपाने पंचवीसेक साध्या वेशातले मिमांसक जगणेपणाच्या ऱ्हस्वतेची चिंता वाहताना दिसतात.
Utsukatene Mee Zopalo

Utsukatene Mee Zopalo

Shyam Manohar

POPULAR PRAKASHAN LTD
2023
pokkari
संवादप्रक्रियेत कमीत कमी संवादघटकांचा ऱ्हास होऊन आपल्याला अभिप्रेत असलेला आशय पोचवणे हा श्याम मनोहर यांचा लेखनविशेष. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' या कादंबरीत क्रिमिनल आणि दयाळ या दोघांतल्या तुंबळ युद्धाची कहाणी आहे. श्याम मनोहरांनी दुसरे तात्या, प्रा.वडनेरे, संतोष, केशव, डॉ. मुरलीधर वगैरे पात्रे तपशिलात रंगवली आहेत. एक म्हातारा आपल्या कल्पनेतून ही पात्रे तयार करतो आणि त्यांच्याविषयी लिहितो. ते टेप करून लिहायचे काम करता करता मोठ्ठा डल्ला मारायची स्वप्ने पाहणारा एक तरुण म्हणजे क्रिमिनल. म्हाताऱ्याच्या कल्पनेतून नकळत तयार झालेले एक पात्र, जे अनेकदा डायरीत बरेच काही लिहिते ते पात्र म्हणजे दयाळ. अशी एक भन्नाट रचना मनोहरांनी या कादंबरीत केली आहे. श्याम मनोहरांचा निवेदक एका विशिष्ट तिरकस शैलीत बोलतो तसेच याही कादंबरीत आहे. ज्ञान, संशोधन, सभ्यता, संस्कृती अशा संकल्पनांचा आणि त्यांच्या आपल्या समाजातील स्थानाचा, उपस्थितीचा खोलवर धांडोळा श्याम मनोहर यांनी या कादंबरीत घेतला आहे.
Shityudha Sadanand

Shityudha Sadanand

Shyam Manohar

POPULAR PRAKASHAN LTD
2023
pokkari
'कुटुंबव्यवस्था आणि चांदणे', 'कुटुंबव्यवस्था आणि फुलपाखरू' व 'कुटुंबव्यवस्था आणि पाऊस' या तीन भागांनी मिळून 'उत्सुकतेने मी झोपलो' ही कादंबरी साकार झाली आहे. एकाच कादंबरीत अशी तीन स्वतंत्र कथानके असणारा प्रयोग मराठीत नवा आहे. कुटुंबव्यवस्था हे त्याचे सामान सूत्र आहे. 'कुटुंबव्यवस्थेत ज्ञानाचे स्थान' हा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. कुटुंब ज्ञानावर नाही, तर भावनेवर आधारित असते. तिथे केवळ ज्ञानालाच नाही, तर सौंदर्यालाही जागा नसते. रूढी व परंपरा यांतून एक व्यवस्थाच पक्की होत असते. समाज किंवा कुटुंब विचार करू शकत नाही, व्यक्ती विचार करते; पण तो करण्यासाठी सवड व एकांत तिला मिळावा लागतो. मात्र एकटेपणाची मूल्य आपल्या समाजात रुजलेले नाही. कुटुंबात त्याला मान्यता आणि जागा नसते. प्रेम, त्याग, आनंद, दुःख गप्पा, घटनांचे वर्णन यांना जशी तिथे जागा आहे तशी; विचार, निर्मिती, सर्जन या बाबींना कुटुंबात जागा मिळू शकली नाही. जगण्यासाठी केवळ कुटुंब नाही, तर समाज चांगला असावा लागतो. कुटुंबात कोणती चर्चा करावी व कोणती करू नये, याबाबत काही संकेत असतात. कुटुंबात स्वातंत्र्य असल्यासारखे असते; पण तसे ते असत नाही. आपण कोणाबद्दल काय भावना ठेवायची हेही ठरलेले असते. तिथे भावना, प्रेम, स्तुती, गुंतणे असते; पण कुटुंबात विचार केला जात नाही. इमॅजिनेशनला तिथे जागा नसते. अशा रीतीने कुटुंबव्यवस्थेचे अवमूल्यन न करता, तिच्या मर्यादा आणि संवेदनक्षम ज्ञानाची आस असलेल्या माणसांची या व्यवस्थेत जगतानाची तगमग श्याम मनोहर यांनी या कादंबरीमध्ये अत्यंत तरलतेने व्यक्त केली आहे. या कादंबरीसाठी श्याम मनोहर यांना २००८ साली साहित्य अकादेमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Kheksat Mhanane, I Love You

Kheksat Mhanane, I Love You

Shyam Manohar

POPULAR PRAKASHAN LTD
1905
nidottu
संवादप्रक्रियेत कमीत कमी संवादघटकांचा ऱ्हास होऊन आपल्याला अभिप्रेत असलेला आशय पोचवणे हा श्याम मनोहर यांचा लेखनविशेष. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' या कादंबरीत क्रिमिनल आणि दयाळ या दोघांतल्या तुंबळ युद्धाची कहाणी आहे. श्याम मनोहरांनी दुसरे तात्या, प्रा.वडनेरे, संतोष, केशव, डॉ. मुरलीधर वगैरे पात्रे तपशिलात रंगवली आहेत. एक म्हातारा आपल्या कल्पनेतून ही पात्रे तयार करतो आणि त्यांच्याविषयी लिहितो. ते टेप करून लिहायचे काम करता करता मोठ्ठा डल्ला मारायची स्वप्ने पाहणारा एक तरुण म्हणजे क्रिमिनल. म्हाताऱ्याच्या कल्पनेतून नकळत तयार झालेले एक पात्र, जे अनेकदा डायरीत बरेच काही लिहिते ते पात्र म्हणजे दयाळ. अशी एक भन्नाट रचना मनोहरांनी या कादंबरीत केली आहे. श्याम मनोहरांचा निवेदक एका विशिष्ट तिरकस शैलीत बोलतो तसेच याही कादंबरीत आहे. ज्ञान, संशोधन, सभ्यता, संस्कृती अशा संकल्पनांचा आणि त्यांच्या आपल्या समाजातील स्थानाचा, उपस्थितीचा खोलवर धांडोळा श्याम मनोहर यांनी या कादंबरीत घेतला आहे.
Prem Ani Khoop Khoop Nantar

Prem Ani Khoop Khoop Nantar

Shyam Manohar

Popular Prakashan Pvt Ltd
2018
pokkari
तरुण नरेंद्र आणि तरुण दीपिका प्रेमात पडतात. नरेंद्र दीपिकाच्या अनवट प्रेमाने मोहित असतो आणि त्याला मधूनमधून प्रेमात दीपिकाच व्हिलन वाटते. दोघांचे लग्न होते. "आपल्यासारखा मधुचंद्र सर्व तरुणतरुणींचा व्हायला हवा. आपण तरुणतरुणींची मधुचंद्रासंदर्भात शिबिरे घ्यायला हवीत," असे नरेंद्र म्हणतो. खूप खूप नंतर तृप्त जीवन जगलेले नरेंद्रजी आणि दीपिकाजी... नरेंद्र आणि दीपिकाजी दुसरा मधुचंद्र साजरा करतात. परिस्थिती असे वळण घेते की नरेंद्रजी दीपिकाजींवर गोळी झाडतात... तरुणपणापासून दीपिकाजी शोधत असतात. अखेरीस त्यांना ते सापडतेही. श्याम मनोहरांची अशी ठाम धारणा आहे की, सद्यःकालीन व्यापक सामाजिक स्थितिप्रियतेच्या मुळाशी माध्यम वर्गाची बुद्धिविरोधी वृत्ती आहे. आमच्या समाजजीवनाला वैज्ञानिक पाया नाही. आम्हाला ज्ञानप्राप्तीची खरी ओढच नाही. माहितीच्या क्रांतीत मग्न असलेला आजचा समाज ज्ञानसमाजाच्या आदर्शापासून दुरावत चालला आहे. आम्ही कोरडे विचार खूप गिरवले, तत्त्ववैचारिक उसनवारीही उदंड केली; पण ज्ञान संपादन करून सुधारणा किंवा चळवळी केल्या नाहीत... श्याम मनोहरांच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उठत राहणे अटळ आहे. ज्याला या समाजाचे, संस्कृतीचे आणि सभ्यतेचे गतिशास्त्र समजून घ्यायचं असेल त्याला, तसेच ज्यांचं मानवी प्रश्नांच्या 'रेडिमेड' उत्तरांनी समाधान होणार नसेल त्यालाही श्याम मनोहरांचं साहित्य नीट अभ्यासण्यावाचून गत्यंतर नाही. त्यांच्याइतका समकालीन आणि प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेतून निवडलेल्या प्रसंगांद्वारे आपल्या लेखनातून तत्त्ववैचारिकतेचं ओतप्रोत माप वाचकांच्या पदरात घालणारा दुसरा लेखक आजतरी नाही.
Amhi Halhal Pawalo

Amhi Halhal Pawalo

Shyam Manohar

POPULAR PRAKASHAN LTD
2022
pokkari
पाचजणं आहेत. चाळिशीतले. तरुणाईचा उत्साह असणारे. पाचीजणं इतके एकरूप, त्यांच्या बोलण्यात आम्ही असं अनेकवचनी सर्वनाम येतु. पाचीजणं व्यावसायिक आहेत. खूप कष्ट करतात. व्यवसायात रमलेले. आनंदाने जगणारे. कुटुंबांना आनंदात ठेवणारे. त्यांच्या जगण्यात, व्यवसायात अडचणी, संकटे येतात. काही काळ त्यांचे आनंदात जगणे विस्कटते. अडचणी, संकटे ह्यावर ते मार्ग काढतात आणि आनंदाचे जगणे पुन्हा प्रस्थापित करतात. त्यांनी किंवा कुणीही कल्पनाही करू शकणार नाही, असे चमत्कारिक त्यांच्या जगण्यात येते. ते बिथरतातही... त्यांचे आनंदात जगणे कायमचे विस्कटते. तरी त्यांना वेगळे, अमूल्य असे जगण्यातले उमजते. त्यांची त्यांनी आम्ही म्हणत सांगितलेली ही गोष्ट.
Chaar Natak

Chaar Natak

Shyam Manohar

Rajkamal Prakashan Pvt. Ltd
2018
sidottu
'मराठी की रंगपरम्परा बहुत समृद्ध और सजीव रही है और उसका प्रभाव हिन्दी पर भी पड़ा है। मराठी और हिन्दी के बीच रंगमंच और नाटक के क्षेत्र में लगातार आदान-प्रदान होता रहा है। मराठी के प्राय सभी बड़े आधुनिक नाटककारों के नाटक हिन्दी में अनूदित हुए और अनेक निर्देशकों द्वारा कई शहरों में खेले जाते रहे हैं। श्याम मनोहर के चार नाटक मराठी-हिन्दी के विद्वान् निशिकान्त ठकार द्वारा अनूदित होकर यहाँ पहली बार हिन्दी में प्रकाशित हो रहे हैं। रज़ा पुस्तक माला के अन्र्तगत अन्य भारतीय भाषाओं से अच्छी और प्रासंगिक सामग्री हिन्दी में लाने के हमारे प्रयत्न का यह हिस्सा है।.