Kirjojen hintavertailu. Mukana 11 342 296 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjahaku

Etsi kirjoja tekijän nimen, kirjan nimen tai ISBN:n perusteella.

25 kirjaa tekijältä Vijay Tendulkar

Safar

Safar

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1991
pokkari
विजय तेंडुलकर यांच्या नाट्यप्रवासातील एक विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशयांबरोबर त्यांना योग्य अशा आविष्कारपद्धतींचा अवलंब केला किंवा त्या नव्याने निर्माण केल्या. सुरुवातीच्या 'श्रीमंत', 'माणूस नावाचे बेट' सारख्या नाटकांत त्यांनी पारंपरिक सामाजिक नाटकाचा ढाचा वापरला तर 'सरी ग सरी', 'घाशीराम कोतवाल', 'गिधाडे' किंवा 'विठ्ठला' या नाटकांत आशयभिन्नतेनुसार वेगवेगळ्या आविष्कारपद्धती स्वीकारल्या. 'सफर' या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या 'मूड'मध्ये हे नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पाहता येईल किंवा यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधता येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाता जाता सबंध आयुष्याला गवसणी घालणारी. विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात यातील बारकावे अधिक स्पष्ट होतात. या ' अनुभव नाटकाची' ही संहिता.
Chiranjeevi Savbhagyakankshini

Chiranjeevi Savbhagyakankshini

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2018
pokkari
रूढ अर्थाने 'सौभाग्यकांक्षिणी' नाटक वाटावे असे हे नाटक नाही. त्याला सुसूत्र असे जबरदस्त कथानक नाही, फार मोठे आघात नाहीत, कसली गुंतागुंत नाही, आडवळणे नाहीत, अनपेक्षित धक्के नाहीत, भावव्याकुळता नाही, दिपून जाण्याजोगे काही नाही. तुफान हास्यकारक असेही काही नाही. सीध्यासाध्या मध्यमवर्गीयांच्या सरळ रेषेतल्या आयुष्यात ते कुठे घडते? नाटक जीवनाचा आरसा असतो असे आपण सवयीने म्हणतो एवढेच. अन्यथा आरशात दिसत नाही तेच बरेचदा आपल्या नाटकांतून बघायला मिळते. मात्र 'सौभाग्यकांक्षिणी'चे गहिरे वास्तव पाहताना आपले किंवा आपल्या मित्राचे वा शेजाऱ्याचेच चित्र पाहत असल्याचा भास होतो. म्हणूनच 'सौभाग्यकांक्षिणी' हे नाटक नाहीच. एका विवाहेच्छू मुलीला आलेला तो एक अनुभव आहे. प्रकट करायला कमालीचा कठीण असा. लपवून ठेवावा किंवा लपवायलाच हवा असा वाटणारा आणि तरीही बेडरपणे सांगितला गेलाला, विदारक सत्याचा अंतर्मुख करणारा अनुभव. - कमलाकर नाडकर्णी
Dwandwipacha Mukabala

Dwandwipacha Mukabala

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2018
pokkari
लेखनापेक्षा मी जीवनावर अधिक प्रेम करतो. लिहिण्यापेक्षा लहान मुलांशी खेळणे, माणसांत मिसळणे किंवा एखादी नवीन कला शिकणे यांत मी अधिक रमतो.' हे उद्गार आहेत अभिजात नाटककार विजय तेंडुलकर यांचे. तत्कालीन नाटककारांच्या नाटकांहून तेंडुलकरांच्या नाटकांचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक नाटकात त्यांनी माणसाच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस आणि त्याचे मन, माणसाचे एकटेपण ह्याला नाट्यविषय करण्याचा प्रथम प्रयत्न तेंडुलकरांच्या नाटकांतून झालेला दिसतो. त्यादृष्टीने तेंडुलकरांनी चाकोरीत फिरणाऱ्या मराठी नाटकांना नवी दिशा मिळवून दिली असे म्हणता येईल. नाटकांच्या कथाविषयाबरोबरच त्यांनी नाटकांच्या तंत्रातही उत्तरोत्तर बदल केले व तंत्रदृष्ट्याही मराठी नाटक संपन्न झाले. विजय तेंडुलकरांच्या अनेक नाटकांचे इतर भाषांमध्येही भाषांतर झालेले आहे. त्यामुळे तेंडुलकर हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नाटककार ठरतात. त्याशिवाय कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, संगीत नाटक अकादेमी पुरस्कार, कालिदास सन्मान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी सन्मानही त्यांना मिळाले आहेत.
Kanyadan

Kanyadan

Vijay Tendulkar

Popular Prakashan Pvt Ltd
1905
pokkari
के. के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय पातळीवरचा 'सरस्वती सन्मान' या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एका मराठी नाटककाराला मिळाला. हा सर्वोच्च सन्मान विजय तेंडुलकरांना मिळावा याविषयी कोणाचेही दुमत नव्हते; परंतु तो त्यांच्या 'कन्यादान' या नाटकाला मिळावा याचे काहीसे आश्चर्य अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. तेंडुलकरांच्या ज्या नाटकांना अमाप प्रसिद्धी मिळाली ('शांतता कोर्ट चालू आहे'), ज्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले ('घाशीराम कोतवाल') किंवा ज्यांमुळे तेंडुलकर वादाच्या भोवऱ्यात सापडले ('गिधाडे', 'सखाराम बाइंडर') अशा नाटकांपुढे 'कन्यादान'चे कौतुक झाले नव्हते किंवा त्या नाटकाचे मोठेपण जाणवले नव्हते. 'कन्यादान' या नावापासूनच कौटुंबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते. आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते. दलित विचारधारणा, समाजवादी विचारधारणा, स्त्री-पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत. याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय तेंडुलकरांची मते सर्वज्ञात आहेत. आणि तरीही हे नाटक कुठेही प्रचारकी होताना मात्र दिसत नाही. कारण नाटकातील प्रत्येक पात्राचे मानसशास्त्रीय आकलन लेखकाला आहे. नाथ देवळालीकर, सेवा, ज्योती, अरुण, एवढेच नव्हे तर संपूर्ण नाटकात जवळ जवळ नगण्य ठरलेला जयप्रकाश यांचे परस्परांतले संबंध स्वाभाविक वाटतात. त्यांच्या विचार करण्याच्या वागण्याच्या पद्धतीत लेखकाचा विचार डोकावत नाही. हेच या नाटकाचे फार मोठे यश आहे.
Ek Hatti Mulagi

Ek Hatti Mulagi

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1978
pokkari
स्वातंत्र्योत्तर काळात समाजात ढासळत चाललेली मूल्यव्यवस्था आणि त्याचा विरोध करत नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा 'एक हट्टी मुलगी' या नाटकाद्वारे विजय तेंडुलकरांनी व्यक्त केली आहे. या नाटकातील जीवनपट आणि व्यक्तिरेखा कनिष्ठ मानलेल्या मध्यमवर्गातील आहेत. संवाद आणि रंगमंचीय सूचना यांतून या नाटकातील आशयाचे अनेक स्तर उलगडताना दिसतील.
Vitthala

Vitthala

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1985
pokkari
केवळ गंभीर प्रवृत्तीचीच नाटके विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाहीत तर सुखात्मिका आणि तिची वेगवेगळी रूपे म्हणता येतील अशी नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. गंभीर प्रवृत्तीच्या नाटकांइतकीच ही नाटके आशयघन आहेत. हलकीफुलकी असली तरी ही नाटके उथळ नाहीत; संयम आणि सहजतेच्या सीमारेषा यांत पाळलेल्या आहेत. 'विठ्ठला' हे नाटक अशाच प्रकारच्या विनोदी माध्यमातून जाणारे हलकेफुलके नाटक विनोदी, चटकदार संवाद आणि काल्पनिकता यांमुळे हे नाटक तेंडुलकरांच्या इतर नाटकांहून खूप वेगळे आहे.
Bebi

Bebi

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले असेल अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक्तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे. 'गिधाडे' प्रमाणेच या नाटकातील व्यक्तिरेखा परिस्थितीपुढे अगतिक आहेत. भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारे हे नाटक एका अनिश्चित शेवटावर प्रेक्षक-वाचकांना बधीर करणारा अनुभव देते आणि एकप्रकारचे सुन्नपणा मनात भरून राहते.
Ashi Pakhare Yeti

Ashi Pakhare Yeti

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2022
pokkari
अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकी 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण नावाच्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.
Chimaniche Ghar Hote Menache

Chimaniche Ghar Hote Menache

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
स्वप्नरम्यता, अतिशयोक्ती, अतिरंजन किंवा विपरित वास्तव यांचा आधार न घेता तेंडुलकरांनी लिहिलेल्या अनेक नाटकांतील विनोदात करुणेचे अंग भिनलेले असते. या नाटकांत सफल, सुखी जीवनाची चित्रे असतातच असे नाही तर हास्यनिर्मितीचे प्रसंग असतात, पण हे प्रसंग हास्यात वाहून जात नाही. या प्रकारात बसणारे नाटक म्हणजे 'चिमणीचं घर होतं मेणाचं'.
Bhalyakaka

Bhalyakaka

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
'भल्याकाका'मध्ये एक वेगळाच रचनाविष्कार तेंडुलकर स्वीकारतात. पूर्वीच्या संस्थानात सेनापती असलेला आणि वर्तमानात पोलीस हवालदार असलेला भल्याकाका. मनाने, अनुभवाने दोन्ही काळात कसा जगतो त्याचे प्रत्ययकारी चित्रण आहे.
Bhau Murarrao

Bhau Murarrao

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
भाऊ मुरारराव यासारख्या नाटकांत मनोविश्लेषणात्मक पद्धतीचा अंगीकार केला आहे. एक मुख्यमंत्री, त्याला पूर्वी ज्याने आपली किडनी दान केली तो सिकंदर यांच्यातील द्वंद्वनाट्य तेंडुलकर उभे करतात. राजकारण आणि मानसिक विश्लेषण यांचा सांधा ते जोडू पाहतात. त्यातल्या प्रवृत्तींचे दर्शन घडवणे हा त्यांचा हेतू असल्याने या नाट्यलेखनाला एक वेगळे परिणाम लाभले आहे.
Kavalyanchi Shala

Kavalyanchi Shala

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1964
pokkari
विजय तेंडुलकरांचे पहिले विनोदी नाटक 'गृहस्थ' या नाटकानंतर अतिशय उद्वेगाने आयुष्यात नाटक म्हणून लिहायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते. 'हे तुझे पहिले नाटक लक्षात घेता बरे लिहिले आहेस, देअर ईज समथिंग इन इट ' ह्या वडील बंधू रघुनाथ तेंडुलकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी या नाटकाचे पुनर्लेखन केले. चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची कर्मकहाणी आहे.