Kirjojen hintavertailu. Mukana 12 246 058 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjailija

Vijay Tendulkar

Kirjat ja teokset yhdessä paikassa: 26 kirjaa, julkaisuja vuosilta 1900-2023, suosituimpien joukossa Tyachi Pachavi. Vertaile teosten hintoja ja tarkista saatavuus suomalaisista kirjakaupoista.

26 kirjaa

Kirjojen julkaisuhaarukka 1900-2023.

Tyachi Pachavi

Tyachi Pachavi

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2009
nidottu
'सखाराम बाइंडर' हे तेंडुलकरांच्या गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक या नाटकातील सामाजिक आशय, भेदक व्यक्तिचित्रण, तेंडुलकरांची अखंड प्रयोगशीलता आणि सहज न रुचणारी भाषा यामुळे हे नाटक बरेच गाजले. या नाटकाचा 'पूर्वरंग' असणारे 'त्याची पाचवी' हे नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिले ते अमेरिकेतील एका महोत्सवासाठी. चंद्रशेखर फणसळकरांनी केलेला ह्या नाटकाचा मराठी अनुवाद तेंडुलकरांच्या खास शैलीची साक्ष पटवून देतो.
Ashi Pakhare Yeti

Ashi Pakhare Yeti

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2022
pokkari
अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकी 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण नावाच्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.
Zhala Anant Hanumant

Zhala Anant Hanumant

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2005
pokkari
...माझ्या काळात माणसाचं जगणं, त्याचं भवितव्य म्हणजेच त्याची नियती ही त्याच्या हाती फारशी राहिली आहे असं मला दिसत नाही. अनेक दृश्य आणि अदृश्य शक्तिशाली प्रवाह माणसाला अनेक दिशांनी खेचण्याचे किंवा रेटण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अट्टाहास अखंडितपणे करीत आहेत असं दृश्य मला दिसतं. मी किंवा कुणीही निर्माण करण्याला प्रवृत्त होतो तो जगण्यातल्या त्याच्या गुंतवणुकीतून. त्या अर्थी तो तटस्थ असत नाही. कशाचं तरी दुःख, कशावरचा तरी राग, कसला तरी आनंद निर्मिती घडवतो....... - विजय तेंडुलकर
Kavalyanchi Shala

Kavalyanchi Shala

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1964
pokkari
विजय तेंडुलकरांचे पहिले विनोदी नाटक 'गृहस्थ' या नाटकानंतर अतिशय उद्वेगाने आयुष्यात नाटक म्हणून लिहायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते. 'हे तुझे पहिले नाटक लक्षात घेता बरे लिहिले आहेस, देअर ईज समथिंग इन इट ' ह्या वडील बंधू रघुनाथ तेंडुलकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी या नाटकाचे पुनर्लेखन केले. चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची कर्मकहाणी आहे.
Gharate Amuche Chhan

Gharate Amuche Chhan

Vijay Tendulkar; ???? ????????

POPULAR PRAKASHAN LTD
1905
pokkari
व्यक्तिनिष्ठ, समाजनिष्ठ (वस्तुनिष्ठ), समूहनिष्ठ अशा कोणत्याही साच्यात न सामावणे ही तेंडुलकरांच्या नाटकांची प्रकृती आहे. म्हणूनच त्यांच्या नाट्यकृतींत संमिश्र स्वरूपाची जीवनचित्रे निर्माण झालेली दिसतात. कुटुंबजीवन हा ज्यांचा मूलाधार आहे, अशी काही नाटके तेंडुलकरांनी लिहिली आहेत. पण त्यांत जराही पुनरावृत्ती दिसत नाही. प्रत्येक नाटकात कौटुंबिक पार्श्वभूमी कौटुंबिक संस्कृती या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 'घरटे आमुचे छान' हे नाटकही कौटुंबिक पार्श्वभूमी असलेलं तेंडुलकरांचे महत्त्वाचे नाटक आहे.
Madhlya Bhinti

Madhlya Bhinti

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1905
pokkari
नेहमीच्या कौटुंबिक आणि सांकेतिक नाटकासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी 'मधल्या भिंती' या नाटकात असूनही हे नेहमीचे कौटुंबिक नाटक नाही. हे नाटक रंजनप्रधान नाही. आणि अश्रुधारा वाहविणारेदेखील नाही. वास्तवातल्या व्यक्ती-व्यक्तीसंबंधांतले भावपूर्ण ताण यात असूनही हे नाटक भावजड होत नाही. तरीही परिस्थिती आणि व्यक्ती यांच्यातील संघर्षाचे गांभीर्य, तारुण्यसुलभ भावनात्मकता, प्रौढधर्मी विचारीपणा आणि वार्धक्यातील कणव ममत्व ह्यातून उभारणारे व्यामिश्र परिस्थितीतील नाट्य यात अनुभवता येते.
Phutpayaricha Samrat

Phutpayaricha Samrat

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1905
pokkari
फूटपायरीवर जगणाऱ्यांचे जीवन हा सर्वसामान्य माणसाला थोडीशी चीड आणणारा विषय असला तरी विजय तेंडुलकरांनी त्यांच्या जीवनातले गांभीर्य वेगळ्याप्रकारे या वगनाट्यातून साकारले आहे. रोज सकाळी उठल्यानंतर 'आपण जिवंत आहोत' याच आनंदात जगणाऱ्या या रस्त्यावरच्या माणसांची श्रीमंतीची स्वप्ने आणि त्या निमित्ताने तेंडुलकरांनी घडवलेले बजबजपुरीचे दर्शन नकळत आपल्या सभोवतालच्या समाजाचेच प्रतिबिंब बनते.
Chimaniche Ghar Hote Menache

Chimaniche Ghar Hote Menache

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
स्वप्नरम्यता, अतिशयोक्ती, अतिरंजन किंवा विपरित वास्तव यांचा आधार न घेता तेंडुलकरांनी लिहिलेल्या अनेक नाटकांतील विनोदात करुणेचे अंग भिनलेले असते. या नाटकांत सफल, सुखी जीवनाची चित्रे असतातच असे नाही तर हास्यनिर्मितीचे प्रसंग असतात, पण हे प्रसंग हास्यात वाहून जात नाही. या प्रकारात बसणारे नाटक म्हणजे 'चिमणीचं घर होतं मेणाचं'.
Bhau Murarrao

Bhau Murarrao

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
भाऊ मुरारराव यासारख्या नाटकांत मनोविश्लेषणात्मक पद्धतीचा अंगीकार केला आहे. एक मुख्यमंत्री, त्याला पूर्वी ज्याने आपली किडनी दान केली तो सिकंदर यांच्यातील द्वंद्वनाट्य तेंडुलकर उभे करतात. राजकारण आणि मानसिक विश्लेषण यांचा सांधा ते जोडू पाहतात. त्यातल्या प्रवृत्तींचे दर्शन घडवणे हा त्यांचा हेतू असल्याने या नाट्यलेखनाला एक वेगळे परिणाम लाभले आहे.
Bhalyakaka

Bhalyakaka

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
'भल्याकाका'मध्ये एक वेगळाच रचनाविष्कार तेंडुलकर स्वीकारतात. पूर्वीच्या संस्थानात सेनापती असलेला आणि वर्तमानात पोलीस हवालदार असलेला भल्याकाका. मनाने, अनुभवाने दोन्ही काळात कसा जगतो त्याचे प्रत्ययकारी चित्रण आहे.
Bebi

Bebi

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
1900
pokkari
सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले असेल अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक्तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे. 'गिधाडे' प्रमाणेच या नाटकातील व्यक्तिरेखा परिस्थितीपुढे अगतिक आहेत. भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारे हे नाटक एका अनिश्चित शेवटावर प्रेक्षक-वाचकांना बधीर करणारा अनुभव देते आणि एकप्रकारचे सुन्नपणा मनात भरून राहते.
Dwandwipacha Mukabala

Dwandwipacha Mukabala

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2018
pokkari
लेखनापेक्षा मी जीवनावर अधिक प्रेम करतो. लिहिण्यापेक्षा लहान मुलांशी खेळणे, माणसांत मिसळणे किंवा एखादी नवीन कला शिकणे यांत मी अधिक रमतो.' हे उद्गार आहेत अभिजात नाटककार विजय तेंडुलकर यांचे. तत्कालीन नाटककारांच्या नाटकांहून तेंडुलकरांच्या नाटकांचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक नाटकात त्यांनी माणसाच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस आणि त्याचे मन, माणसाचे एकटेपण ह्याला नाट्यविषय करण्याचा प्रथम प्रयत्न तेंडुलकरांच्या नाटकांतून झालेला दिसतो. त्यादृष्टीने तेंडुलकरांनी चाकोरीत फिरणाऱ्या मराठी नाटकांना नवी दिशा मिळवून दिली असे म्हणता येईल. नाटकांच्या कथाविषयाबरोबरच त्यांनी नाटकांच्या तंत्रातही उत्तरोत्तर बदल केले व तंत्रदृष्ट्याही मराठी नाटक संपन्न झाले. विजय तेंडुलकरांच्या अनेक नाटकांचे इतर भाषांमध्येही भाषांतर झालेले आहे. त्यामुळे तेंडुलकर हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नाटककार ठरतात. त्याशिवाय कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, संगीत नाटक अकादेमी पुरस्कार, कालिदास सन्मान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी सन्मानही त्यांना मिळाले आहेत.
Chiranjeevi Savbhagyakankshini

Chiranjeevi Savbhagyakankshini

Vijay Tendulkar

POPULAR PRAKASHAN LTD
2018
pokkari
रूढ अर्थाने 'सौभाग्यकांक्षिणी' नाटक वाटावे असे हे नाटक नाही. त्याला सुसूत्र असे जबरदस्त कथानक नाही, फार मोठे आघात नाहीत, कसली गुंतागुंत नाही, आडवळणे नाहीत, अनपेक्षित धक्के नाहीत, भावव्याकुळता नाही, दिपून जाण्याजोगे काही नाही. तुफान हास्यकारक असेही काही नाही. सीध्यासाध्या मध्यमवर्गीयांच्या सरळ रेषेतल्या आयुष्यात ते कुठे घडते? नाटक जीवनाचा आरसा असतो असे आपण सवयीने म्हणतो एवढेच. अन्यथा आरशात दिसत नाही तेच बरेचदा आपल्या नाटकांतून बघायला मिळते. मात्र 'सौभाग्यकांक्षिणी'चे गहिरे वास्तव पाहताना आपले किंवा आपल्या मित्राचे वा शेजाऱ्याचेच चित्र पाहत असल्याचा भास होतो. म्हणूनच 'सौभाग्यकांक्षिणी' हे नाटक नाहीच. एका विवाहेच्छू मुलीला आलेला तो एक अनुभव आहे. प्रकट करायला कमालीचा कठीण असा. लपवून ठेवावा किंवा लपवायलाच हवा असा वाटणारा आणि तरीही बेडरपणे सांगितला गेलाला, विदारक सत्याचा अंतर्मुख करणारा अनुभव. - कमलाकर नाडकर्णी